शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 4:17 PM

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : बिहारच्या काराकाट लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडीवर जोरदार पलटवार केला आहे.

बिहारच्या काराकाट लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडीवर जोरदार पलटवार केला आहे. नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्या त्यांना लवकरच जेलमध्ये पाठवलं जाईल, असंही म्हटलं आहे. 

बिहारमधील काराकाटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हेलिकॉप्टरमध्ये चक्कर मारण्याची वेळ पूर्ण होताच जेलमध्ये जाण्याचा मार्ग निश्चित केला जाईल. बिहार लुटणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे."

"काउंटडाउन सुरू झालं"

"मी बिहारच्या जनतेला आणखी एक गॅरंटी देत ​​आहे, ज्यांनी बिहारच्या गरिबांना लुटलं आणि त्यांना नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेतल्या, कान देऊन ऐका. त्यांचं जेलमध्ये जाण्याचं काउंटडाउन सुरू झालं."

"आज अयोध्येत भव्य राम मंदिर आहे. काही गोंधळ झाला का? असं म्हटलं होतं की कलम 370 हटवलं तर आग लागेल? देशात बॉम्बस्फोट होतील. त्यांच्या धमक्यांना मोदी घाबरले नाहीत आणि थांबले नाहीत, कुठेतरी आग लागली आहे का? हे लोक घाबरवण्याचं काम करतात."

काँग्रेस आणि आरजेडीवर साधला निशाणा 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "हे भ्याड काँग्रेस आणि आरजेडीचे लोक म्हणत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, घाबरा. या भ्याड लोकांमुळे पाकिस्तानचे दहशतवादी हवं तेव्हा भारतावर हल्ले करायचे आणि निघून जायचे. मोदी त्यांच्यासारखे घाबरत नाहीत."

"जेलमध्ये जावंच लागेल"

"मोदींनी लष्कराला सांगितलं की, घरात घुसून मारा. आज पाकिस्तान काहीही करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो. आज नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचं काम सुरू आहे ज्यांच्या नावाने हे लोक घाबरायचे. मोदी घाबरत नाहीत. कोणीही मोठी व्यक्ती असूदे जेलमध्ये जावंच लागेल."

"काँग्रेसने केलाय अपमान"

मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. "काँग्रेसच्या पंजाबच्या नेत्याने बिहारमधून कामासाठी गेलेल्या आमच्या बिहारी मजूर बंधू-भगिनींचा घोर अपमान केला आहे. बिहारच्या लोकांना पंजाबमध्ये घरं दिली जाणार नाहीत, त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे."

"बिहारच्या लोकांचा एवढा अपमान केल्याबद्दल काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांची माफी मागितली आहे का? डीएमके नेत्याने बिहारच्या लोकांना शिव्या दिल्या, ममता बॅनर्जी रोज त्यांना शिव्या देतात. पण काँग्रेस-ममता आणि डीएमकेविरोधात एक शब्दही बोलण्याची हिंमत आरजेडीमध्ये नाही" असं मोदींनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Biharबिहारcongressकाँग्रेस