Join us  

Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 4:58 PM

Janhvi Kapoor :बॉलिवूडची धडक गर्ल म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर सतत चर्चेत येत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूडची धडक गर्ल म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सतत चर्चेत येत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'(Mr And Mrs Mahi)च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या क्रिकेट ड्रामामध्ये ती राजकुमार राव(Rajkumar Rao)सोबत दिसणार आहे. अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सक्रियपणे व्यस्त आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत'दोस्ताना २' (Dostana 2) ची सुरू असलेली शूटिंग मध्येच का थांबवण्यात आली, याबद्दल सांगितले

जान्हवी कपूरचीकरण जोहर निर्मित 'दोस्ताना २' मध्ये कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवानी यांच्यासोबत दिसण्यासाठी निवड करण्यात आली होती. तथापि, २०२१ मध्ये, ऑनलाइन अफवा पसरल्या की कार्तिक आणि करणमध्ये मतभेद आहेत, ज्यानंतर त्यांना चित्रपटातून बाहेर पडावे लागले आणि त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, "मला देखील माहित नाही. आम्ही जवळपास ३० ते ३५ दिवस त्या चित्रपटाचे शूटिंग केले. माझ्या मते शूटिंग खूप चांगले चालले होते. मला माहित नाही की चित्रपट का थांबवला गेला."

...पण मला माहित नाही

ती पुढे म्हणाली की, "आम्ही कोविडच्या खूप आधी त्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते आणि नंतर कोविड झाला आणि दीड वर्षांपेक्षा जास्त उशीर झाला. तेव्हा लोकांना वाटले की चित्रपट पुन्हा सुरू केला पाहिजे...पण मला माहित नाही." 

''त्या दोघांसाठी काम महत्त्वाचं''पुढे मुलाखतीत, जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की हे सर्व कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील मतभेदामुळे झाले आहे, तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिले, "मला असे वाटत नाही. मला वाटते की या दोघांसाठी काम खूप महत्वाचे आहे. पण त्यांच्यात काय झालं, ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मला त्याबद्दल फारसं काही माहीत नाही. मात्र, असं काही झालं असेल असं मला वाटत नाही.

टॅग्स :जान्हवी कपूरकार्तिक आर्यनकरण जोहर