Join us  

ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 3:32 PM

Open in App

ENG vs PAK 2nd T20I Match : पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. आज शनिवारी दुसरा सामना खेळवला जात आहे. ही मालिका म्हणजे पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघाची वर्ल्ड कप तयारी असणार आहे. आजचा दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला बाबर आझमची महिला चाहती नबीहा खानने बाबरला आज शतक झळकावण्याची विनंती केली. तसेच बाबरने आज चांगली कामगिरी केल्यास ती तिच्या वडिलांना महागडी गाडी भेट देणार असल्याचे तिने सांगितले. 

बाबर आझमची महिला फॅन म्हणाली की, मी माझ्या वडिलांसोबत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली आहे. मी एक मेडिकल स्टुडन्ट आहे. माझ्या वडिलांचे मित्र हा सामना पाहण्यासाठी खास कतारहून आले आहेत. पाकिस्तानी संघाने चांगल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांनी आजचा सामना जिंकलाच पाहिजे. खासकरून बाबर आझमने आम्हाला पुन्हा निराश करू नये. आज बाबरने चांगली खेळी केल्यास, त्याने शतक झळकावल्यास मी माझ्या वडिलांना महागडी कार भेट म्हणून देईन. बाबरची फॅन पाकिस्तानातील जिओ न्यूजशी बोलत होती. 

इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, इरफान खान नियाझी, इफ्तिखार अहमद, उस्मान खान, आझम खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, सलमान अली आगा. 

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा २२ मे - पहिला ट्वेंटी-२० सामना २५ मे - दुसरा ट्वेंटी-२० सामना२८ मे - तिसरा ट्वेंटी-२० सामना ३० मे - चौथा ट्वेंटी-२० सामना

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानटी-20 क्रिकेटइंग्लंड