शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजाचे राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: August 21, 2014 23:04 IST

पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

वाशिम : भोई समाजास १९५0 पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा मिळाव्यात म्हणून शुक्र वार २२ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश, अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ, विदर्भ भोई समाज सेवा संघ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.भोई समाजाला १९५0 पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा सुरू करण्यासाठी भोई समाजाच्या महाराष्ट्रातील विविध संघटनांकडून ६४ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ब्रिटीश सरकारने १९३६ मध्येच भोई समाजाला देशाच्या विविध राज्यात अनुसूचित जाती, जमातीच्या सूचीत समाविष्ट केले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश होता; परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर शासनाने ५ सप्टेंबर १९५0च्या अधिसूचनेनुसार भोई समाजाला महाराष्ट्रात मिळत असलेल्या सवलती काढून या समाजाला भटक्या विमुक्तांच्या प्रवर्गात समाविष्ट केले. दुसरीकडे उडीसा, बिहार, केरळ, कर्नाटक, त्रिपुरा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, प. बंगाल या राज्यांत भोई समाजाला अनुसूचित जाती, तर आसाम, मेघालय, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदि राज्यांत भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवती आजही मिळत आहेत. शासनाने गठीत केलेले सायमन अयंगर आयोग १९४९, काका कालेरकर आयोग १९५३, डी.एन. मेहता आयोग १९६३, लकु र आयोग १९६५, बी.पी. मंडल आयोग १९७८, रेणके आयोग २00६ यांनीही अनुसूचित जाती जमातींना मिळत असलेल्या सवलती भोई समाजाला मिळण्याची शिफारस नुसार केली होती; परंतु शासनाने त्याकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष केले. शासनाने भोई समाजाच्या मागणीचा तातडीने विचार करावा म्हणून महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी क ार्यालयासमोर या समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.