कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:53 PM2019-02-18T14:53:22+5:302019-02-18T14:53:28+5:30

कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे.

Starting the purchase of Tur at the procurment center | कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू

कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. याच पार्श्र्वभुमीवर कारंजा बाजार समितीत शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. 
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, सचिव निलेश भाकरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊराव मते यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती. सदर खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्याकरिता कारंजा खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यातील २५६ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात तूर हमी भावापेक्षा सरासरी प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये कमी दराने विकल्या जात आहे. मात्र, हमीभावात तूर खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांचे होणारे नुकसान थांबेल. खुल्या बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त झाल्यास बाजारभाव पडतात. याचाच प्रत्यय मागील तीन वर्षांपासून देशातील तूर उत्पादक शेतकºयांना येत आहे. यामुळे शेतकºयांच्या होणाºया आर्थिक नुकसानाचा विचार   करता शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करून मर्यादित तूर खरेदी सुरू केली. मागील तीन वर्षांपासून कारंजा केंद्रावर शासकीय तूर खरेदी केल्या जात असून यावर्षी देखील तूर खरेदीला सुरूवात झाली आहे. यासाठी ५ हजार ६७५ रुपये प्रति क्ंिवटल दराने शेतकºयांची तूर खरेदी केल्या जाणार असल्यामुळे तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Web Title: Starting the purchase of Tur at the procurment center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.