शिरपूर येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST2021-01-08T06:11:35+5:302021-01-08T06:11:35+5:30

निरयापक श्रमण मुनीश्री योगसागरजी महाराज व त्यांचा संघ मंगल विहारावर असताना २५ डिसेंबर रोजी शिरपूर येथे दाखल झाला आहे. ...

Space Parshwanath Legislative Program at Shirpur | शिरपूर येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान कार्यक्रम

शिरपूर येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान कार्यक्रम

निरयापक श्रमण मुनीश्री योगसागरजी महाराज व त्यांचा संघ मंगल विहारावर असताना २५ डिसेंबर रोजी शिरपूर येथे दाखल झाला आहे. तेव्हापासून योगसागरजी महाराज यांचा संघ दिगंबर जैन संस्थान‌मध्ये शिरपूर वास्तव्यास आहे. महान तपस्वी मुनीश्रींच्या संघ आगमनाने अंतरिक्ष नगरी शिरपूर येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मुनीश्रींच्या सान्निध्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. येत्या ९ जानेवारी रोजी अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान भ. चंद्रप्रभ व भ. पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तत्पूर्वी अभिषेक, शांतीधारा, पात्र चयन हे कार्यक्रम पार पडतील. त्यानंतर रविवार १० जानेवारी रोजी मुनीश्रींच्या मंगल प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जैन भाविकांनी घ्यावा, असे आवाहन दिगंबर जैन संस्थानकडून करण्यात आले आहे.

Web Title: Space Parshwanath Legislative Program at Shirpur