शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीचा पेरा वाढणार

By admin | Updated: June 27, 2014 01:45 IST

पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार

वाशिम : पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे.तशा स्थितीत जिल्ह्यातील उडीद,मूग व ज्वारीच्या पिकाचे नियोजन केलेल्या शेतकर्‍यांना सोयाबीन किंवा कपाशीच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. परिणामी , जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीचा पेरा यंदा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
मागीलवर्षी ६ जूनला पावसाळयाला प्रारंभ झाला होता व १५ जूनपर्यंत बहुतांश पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी २५ जून उलटून जाउनही नियमित पावसाळा सुरु झालेला नाही.परिणामी जिल्ह्यात बहुतांश पेरण्या बाकीच आहे.राज्यात जुलैच्या पहिल्या आठवडयात नियमित पावसाळा सुरु होण्याचा अंदाज हवामान विषयक विविध वेबसाईटनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात सन २0१४ च्या खरीप हंगामात जिल्हाप्रशासनाने ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेरण्या करण्याचे नियोजन केले आहे.त्यात सोयाबीन २ लाख १३ हजार ९९0 हेक्टर ,कपाशी ५६, हजार ३७0 हेक्टर, तूर ५२,७८0 हेक्टर,ज्वारी ३४,६४0हेक्टर, उडीद ३३,३३0 हेक्टर,मूग ३२,८६0 हेक्टर या प्रमुख पिकांसह तीळ ८७0 हेक्टर,बाजरी ७८0हेक्टर,ऊस २२0 हेक्टर,मका २१0हेक्टर,इतर कडधान्ये २00हेक्टर,इतर तृणधान्ये १00हेक्टर,इतर गळीत धान्ये १00 हेक्टर,तांदूळ १00हेक्टर,भुईमूग २0हेक्टर,सूर्यफुल २0 हेक्टर याप्रमाणे पिकांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात केवळ ४ टक्के एवढय़ा क्षेत्रात पेरण्या झालेल्या आहेत.परंतु, चांगल्या पावसा अभावी अद्यापही जिल्ह्याच्या बहुतांश क्षेत्रात पेरण्या होणे बाकी आहे.