शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार निवृत्ती वेतन! नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:15 IST

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकऱ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन मिळणार आहे.

वाशिम - प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकऱ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन मिळणार आहे. यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे.    प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. ही एक योजना एैच्छिक व अंशदान पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला भारतीय जीवन बिमाद्वारे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रामध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करतेवेळी कोणतीही रक्कम लाभार्थीने भरण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतक-यांनी आधारकार्ड, गाव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतक-यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (पती, पत्नी) वेगवेगळ्या पध्दतीने यात सहभागी होवू शकतात. वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रतीमाह ३ हजार रुपये वेगवेगळ्या स्वरूपात प्रदान केले जाईल. ज्या शेतक-यांनी ही योजना काही कारणास्तव बंद केली किंवा अर्धवट सोडली, अशा शेतक-यांना त्यांनी जमा केलेली रक्कम व्याजासहीत परत दिली जाईल. इच्छुक शेतक-यांनी याबाबत सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी केले.लाभार्थीचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुद्धा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २६ आॅगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPensionनिवृत्ती वेतनIndiaभारतGovernmentसरकार