शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त

By admin | Updated: October 14, 2014 01:49 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त.

वाशिम : १५ ऑक्टोबर रोजीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेने केलेल्या चाचपणीतून जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रे उपद्रवी व संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने परिपूर्ण तयारीचा अंतिम टप्पाही पूर्ण केला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या ४00 जवांनाचा ताफा जिल्ह्यात दाखल झाला असून, स्थानिक पोलिस दलाचे १0६५ आणि गृहरक्षक दलाचे ३५0 जवानही तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यात ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांची संख्या आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८७ हजार ७६९, वाशिम मतदारसंघात ३ लाख २२ हजार ९३४, तर कारंजा मतदारसंघात २ लाख ८६ हजार २२ अशी मतदारसंख्या आहे. जिल्ह्यात ९६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी रिसोड मतदारसंघात ३0९, वाशिम ३३९ व कारंजा मतदारसंघात ३१७ मतदान केंद्रे आहेत. उमेदवार आता छुप्या प्रचाराद्वारे मतदारांना आपलेसे करण्यात गुंतले आहेत. दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्रांची चाचपणी करीत आहे. संवेदनशील मतदान केंद्राची नोंद असलेल्या गावांमधून पोलिस प्रशासनाच्या वतीने रूट मार्चही काढण्यात आला आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघात नऊ मतदान केंद्रांची नोंद संवेदनशील म्हणून झाली आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील १२ आणि कारंजा मतदारसंघात सर्वाधिक १६ मतदान केंद्रे पोलिस प्रशासनाच्या दप्तरी संवेदनशील आहेत.