शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात पहिल्याच दिवशी रामगावची शाळा बंद

By admin | Updated: June 27, 2014 01:45 IST

इचोरीतील शिक्षक गैरहजर : केंद्राधिकार्‍याला कारणेदाखवा

मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यात शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी पं.स.सभापती भास्कर शेगीकर व गटशिक्षणाधिकारी यशवंत मनवर यांनी शाळांना आकस्मिक भेटी दिल्या असता तालुक्यातील रामगाव येथील शाळा चक्क बंद होती तर इचोरी येथील जि.प.शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पाच शिक्षकांची विनावेतन रजा धरण्यात आली तर केंद्राधिकार्‍याला कारणेदाखवा नोटीस देण्याची कारवाई करण्यात आली.
२0१४-१५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला सभापती शेगीकर, गटशिक्षणाधिकारी मनवर व पं.स. च्या कर्मचारी यांनी संयुक्तपणे हिसई, मानोकी, कळंबा बोडखे व आसेगाव या चार केंद्रातील एकूण ७ शाळांना भेटी दिल्या.या शाळाभेटी दरम्यान जि.प. शाळा शहापूर, जि.प.शाळा मोतसावंगा, जि.प.प्राथमिक शाळा वसंतवाडी व बिटोडा भोयर या शाळामधील कामकाज सुरळीत सुरु होते.सर्व शिक्षक शाळेत उपस्थित होते. मात्र रामगावची जि.प.प्राथमिक शाळा चक्क कुलुपबंद होती.या शाळेचा गावाकरी मंडळीसमोर पंचनामा करण्यात आला.त्याचप्रमाणे इचोरी गावातील जि.प. प्राथमिक शाळेतील तीनही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते त्यामळे मध्यान्ह भोजनाच्या वेळी सभापती,गटशिक्षणाधिकारी,शालेय पोषण आहार अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वत: खिचडी वाटप केले शाळा भेटीदरम्यान इयत्ता १ ली मये प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत े पुष्पगुच्छ देउन करण्यात आले तसेच शाळातील उणिवा दूर करण्यासाठी संबंधित शाळाच्या मुख्याध्यापकांना एक आठवडयाचा वेळ देण्यात आला.शाळा बंद असलेल्या व शिक्षक उपस्थित नसलेल्या शाळेच्या केंद्रप्रमुखांना आपल्या केंद्राअंतर्गत शाळांवर नियंत्रण ठेवले नसल्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. रामगाव येथील जि.प. शाळेच्या दोन तर इचोरी येथील जि.प.शाळेच्या तीन अशा एकुण पाच शिक्षकांची एका दिवसाची विनावेतन रजा करण्यात आली आहे.याबाबत सदर शिक्षकांवर पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. वाशिम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.