गिर्डा तांडा येथे महिला मंडळाने राबविले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:14+5:302021-09-07T04:50:14+5:30

गिर्डा तांडा येथील आई भवानी महिला मंडळ सामाजिक कामात अग्रेसर आहे. गावातील सामाजिक, राजकीय समस्यांसह इतर अनेक मुद्दे या ...

Sanitation campaign implemented by Mahila Mandal at Girda Tanda | गिर्डा तांडा येथे महिला मंडळाने राबविले स्वच्छता अभियान

गिर्डा तांडा येथे महिला मंडळाने राबविले स्वच्छता अभियान

गिर्डा तांडा येथील आई भवानी महिला मंडळ सामाजिक कामात अग्रेसर आहे. गावातील सामाजिक, राजकीय समस्यांसह इतर अनेक मुद्दे या मंडळातील महिलांनी उचलून धरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे गावात ठिकठिकाणी साचलेले पाणी, घरालगत वाढलेले गवत, गावातील मुख्य ठिकाणी केले गेलेले अतिक्रमण अशा समस्या निकाली काढण्यासाठी या महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यात पोळा सणाच्या पूर्वसंध्येला आई भवानी महिला मंडळाच्या सदस्य महिलांनी गावातील लोकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व गावात डासांचा मुक्त संचार रोखण्यासाठी स्वयंप्रेरणेने स्वच्छता अभियान राबविले. या अंतर्गत त्यांनी घरालगतची झुडपे, गाजर गवत कापून काढले. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आम्ही गावातील विविध सामाजिक व जनहिताच्या कामासाठी सक्षम आहोत, असा संदेश महिलांनी दिला आहे.

Web Title: Sanitation campaign implemented by Mahila Mandal at Girda Tanda