शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिजातून ३.३७ कोटींचा महसूल

By admin | Updated: April 4, 2015 02:07 IST

एका वर्षातील कारवाई; तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाची संयुक्त मोहीम.

वाशिम : अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणीचा दंड आणि स्वामित्वधन यामधून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाने तीन कोटी ३७ लाख १३ हजार ८0 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ दरम्यानचा हा लेखाजोखा आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौणखनिजाची वाहतूक करणार्‍या १३७ वाहनांकडून वाशिम तहसील कार्यालयाने ११ लाख ७८ हजार ८५0 रुपये दंड वसूल केला आहे. गौणखनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौणखनिजाची वाहतूक करीत असल्याचे वास्तव आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय आणि गौणखनिज कार्यालयाचे पथक कारवाई करते. एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण १३७ वाहनं गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आली. यामध्ये अवैध रेती वाहतुकीची ७६ प्रकरणे आणि अवैध डब्बर, मुरूम वाहतुकीच्या ६१ प्रकरणांचा समावेश आहे. अवैध गौणखनिजप्रकरणी ११.७८ लाखाचा महसूल तहसील कार्यालयाला मिळाला आहे. वाशिम तालुक्यात चार जणांविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील रेती व मुरूम घाटाच्या रॉयल्टीमधून (स्वामित्वधन) एक कोटी ९ लाख ८१ हजार २३७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय वाळूघाट लिलावाच्यावेळी अर्ज फि यामधून ६६ हजार ५00 रुपये महसूल मिळाला आहे. वाशिम तहसील कार्यालयाला अवैध गौण खनिज, अर्ज फी व रॉयल्टी यामधून एक कोटी २२ लाख २६ हजार ५८७ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.