शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजातून २५ लाखांचा महसूल

By admin | Updated: February 15, 2016 02:13 IST

मराठवाड्यातील गौण खनिजाची रिसोडात अवैध विक्री.

विवेकानंद ठाकरे / रिसोड : जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानंतर सक्रिय होत तहसीलच्या पथकाने गौण खनिजप्रकरणी जवळपास २५ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. रिसोड तालुक्यातील स्वामित्वधनाची मालमत्ता जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल प्रशासनाची असताना रेती व इतर गौण खनिजाची चोरी सर्रासपणे सुरू आहे. यावर अंकुश ठेवण्याचे कडक आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. यानंतर महसूल प्रशासन झोपेतून जागे होऊन पाच महिन्यांत रेती चोरीचा एकूण २५ लाख रुपये दंड वसूल करून १३८ प्रकरणांची नोंद घेण्यात आली. आर्थिक वर्ष २0१५-१६ मध्ये प्रारंभी दंडवसुली संथगतीने सुरू होती, ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आल्याने संबंधित विभागांवर कडक ताशेरे ओढण्यात आले. गौण खनिजाची चोरी कोट्यवधीच्या घरात आणि दंड व सुली नगन्य असा प्रकार सर्रासपणे सुरू होता. यामध्ये ह्यअर्थह्णपूर्ण उद्देश दडला होता, ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचली आणि संबंधितांना कडक निर्देश देण्यात आले. यामुळे तालुका प्रशासनाने झोपेतून जागे होत कारवाईचा सपाटा सुरू केला आणि जानेवारी महिन्यात १३ लाख ६६ हजार ४00 रुपयांचा दंड वसूल केला, तर मालमत्ता दिवसामध्ये १ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आकडा पूर्ण केला. संथगतीने चालणारी प्रक्रिया अचानक गतिमान कशी बनली, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरवर्षी स्वामित्वधनाची चोरी किती झाली, याचा आकडा मात्र मिळणे कठीण आहे. त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडले जाते, हे पाहणे आवश्यक आहे. या रेतीघाट प्रकरणात प्रारंभी तीन तलाठय़ांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अद्यापही खरे सूत्रधार हाती लागले नाहीत. स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात ह्यअर्थह्णपूर्ण घडामोडी घडत असतानाही तालुका प्रशासन यापासून अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला. मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणात गौण खनिज रिसोड तालुक्यात येत आहे.