श्रावणधारा कविसंमेलनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:52+5:302021-09-09T04:49:52+5:30

विदर्भ साहित्य संघाच्या वाशिम शाखेतर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोणार येथील युवा ...

Response to Shravanadhara Kavisammelan | श्रावणधारा कविसंमेलनाला प्रतिसाद

श्रावणधारा कविसंमेलनाला प्रतिसाद

विदर्भ साहित्य संघाच्या वाशिम शाखेतर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोणार येथील युवा कवी डॉ. विशाल इंगोले होते. शाखाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी उद्घाटन केले. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रावणमास संपता संपता घेतलेल्या या कविसंमेलनामध्ये निवडक प्रतिभावान कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार रचना सादर केल्या. त्यामध्ये प्रीती मुसळे, हेमंत सावळे, सुरेश येरमुले, भाऊराव तनपुरे, दत्ता शेळके, मधुराणी बनसोड,

सुरेश खरावन, अरविंद उचित, राम धनगर, दीपक ढोले, मोहन शिरसाट, अनिल कांबळे, डॉ. विजय काळे, चाफेश्वर गांगवे, डॉ. विशाल इंगोले यांच्या कवितांच्या धारा बरसल्या. चाफेश्वर गांगवे आणि डॉ. विजय काळे यांनी कविसंमेलनाचे संचालन केले. कविसंमेलनापूर्वी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. बाबाराव मुसळे यांनीही मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले. डाॅ. विजय काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहन शिरसाट यांनी आभार मानले.

Web Title: Response to Shravanadhara Kavisammelan