शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर जि.प. पोटनिवडणुकीचे भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST

संतोष वानखडे वाशिम : स्थगित असलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आणखी लांबणीवर टाकायची की, कोरोना नियंत्रणात असल्याने ...

संतोष वानखडे

वाशिम : स्थगित असलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आणखी लांबणीवर टाकायची की, कोरोना नियंत्रणात असल्याने स्थगिती उठवायची? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा अहवाल मागविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अहवालावर पोटनिवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या सदस्यांची सदस्यत्व रद्द झाले असून, या रिक्त पदांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होणार होती. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील कोरोना प्रादुर्भावाची सद्य:स्थिती काय आहे, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या किती आहे, आदी परिस्थितीचा अहवाल मागविला आहे. जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील कोरोना स्थितीचा अहवाल संबंधितांकडून मागविला असून, सोमवार ६ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या अहवालावर जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

००००००००००००००००००

कोरोना नियंत्रणात; पोटनिवडणूक होण्याची शक्यता?

जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असल्याचे ॲक्टिव्ह रुग्णसंख्येवरून दिसून येते. जिल्ह्यात सध्या १३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यातही पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील ॲक्टिव्ह रुग्ण जवळपास नसल्यातच जमा असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना नियंत्रणात असल्याने पोटनिवडणुकीवरील स्थगिती उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.

०००००००००००

इच्छुक उमेदवार लागणार कामाला

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुन्हा एकदा प्रचारकार्यात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. आता निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना स्थितीचा अहवाल मागविल्याने कोणत्याही क्षणी पोटनिवडणुकीवर स्थगिती उठविली जाऊ शकते, या शक्यतेने ऐनवेळी धावपळ नको म्हणून आपापल्या सर्कलमधील प्रचारयंत्रणा तयार ठेवण्याच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार कामाला लागत असल्याचे दिसून येते.

००००००००००००००

असे होते गट व गणातील उमेदवारी अर्ज

तालुका गट गण

वाशिम ३८ ४८

रिसोड १८ ३१

मानोरा १८ ३३

कारंजा ७ २४

मालेगाव १३ ३५

मं.पीर २८ २३

००००००००००००००००००

कोट

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा अहवाल मागविला आहे. यासंदर्भातील पत्रही प्राप्त झाले असून, सोमवारपर्यंत हा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल.

- शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.