गत निवडणुकीच्या पुनरावृत्तीचे चिन्ह

By Admin | Updated: October 2, 2014 01:12 IST2014-10-02T01:12:01+5:302014-10-02T01:12:01+5:30

कारंजा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचे चिन्हे.

Repetitive sign of the last election | गत निवडणुकीच्या पुनरावृत्तीचे चिन्ह

गत निवडणुकीच्या पुनरावृत्तीचे चिन्ह

वाशिम: कारंजा मतदारसंघात सन २00९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. गत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार प्रकाश डहाके यांच्या विरोधात अपक्ष म्हणून दंड थोपटले हो ते. यावेळी पक्षाने डहाकेंना डावलून उमेदवारीची माळ ठाकरेंच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे प्रकाश डहाके यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. डहाकेंची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे माजीमंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव अनिल धाबेकर यांनी दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे काँग्रेस तुर्तास रिलॅक्स झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार हेमेंद्र ठाकरेंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे महायुतीमधील बंड शांत झाले आहे.

Web Title: Repetitive sign of the last election