शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 20:07 IST

Washim News : सकाळी ७ ते ११ या वेळेत लसीकरण मोहिम राबवावी, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून उमटत आहे.

कारंजा लाड : ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देणे सुरू असून, १२ मे रोजी कारंजा शहरात भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तासात ताटकळत बसावे लागले. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात झाला तर? असा प्रश्न ज्येष्ठांमधून उपस्थित होत असून, सकाळी ७ ते ११ या वेळेत लसीकरण मोहिम राबवावी, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून उमटत आहे.
कारंजा शहरात विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी १०० डोस तर मूलजी जेठा हायस्कुल येथे २५० डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही ठिकाणी दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी टोकन वाटण्यात येत आहे. टोकन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सकाळी ६ वाजतापासून रांगेत उभे राहतात. ३५० लस घेण्यासाठी जवळपास ७०० नागरिक रांगेत उभे राहतात. त्यानंतर दोन तासाने रांगेत असणाऱ्यांना टोकन वाटण्यात येते. नंतर पुन्हा अडीच तासाने म्हणजे ९.३० वाजताच्या सुमारास आरोग्य कर्मचारी आल्यानंतर लसीकरणास सुरवात होते. ऊन अंगावर घेऊन लस घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
नागरिकांना तीन तास पेक्षा उन्हात बसून किंवा ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी बसावे लागते. त्यामुळे लसीकरणाची वेळ सकाळी ७ ते ११ या वेळेत करावी, अशी मागणी अक्षय देशमुख यांच्यासह ज्येष्ठांनी मंगळवारी केली.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लसKaranjaकारंजा