शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मध्यम प्रकल्पांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रखडला!

By admin | Updated: December 31, 2014 01:09 IST

उंची वाढल्यास पाणीटंचाई होणार दूर : सिंचनाचीही होणार व्यवस्था.

नंदकिशोर नारे / वाशिम:  जिल्हय़ात तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी एकबुर्जी व अडाण या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून, लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा केला; मात्र सदर प्रस्ताव रखडलेले आहेत. या प्रकल्पांची उंची वाढविल्यास बर्‍याच अंशी पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न निकाली लागू शकतो. वाशिम जिल्हय़ात एकही मोठा प्रकल्प नाही. तीन मध्यम प्रकल्प असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, मालेगाव तालुक्यातील सोनल व कारंजा तालुक्यातील अडाण या प्रकल्पाचा समावेश आहे. यासह १00 लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा केल्या जातो; परंतु एकबुर्जी धरणाची उंची कमी असल्याकारणाने शहराला आवश्यक व मुलबक पाणीपुरवठा होत नाही. धरणाच्या कमी उंचीमुळे शेतीच्या सिंचनाकरितासुद्धा आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. एकबुर्जी उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर धरणाची उंची वाढल्यास शहरातील पाणी समस्या तर दूर होईलच शिवाय शेतकर्‍यांना सिंचानाकरिता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील उद्योगांना पाणीपुरवठा होऊन मागासलेल्या जिल्हय़ाच्या विकासास चालना मिळेल. तसेच कारंजा तालुक्यातील अडाण धरणाची उंची वाढण्यासंदर्भात जनतेची बर्‍याच दिवसांची मागणी आहे; मात्र ही मागणीही अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यामध्ये असला तरी या प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेजारील तालुक्याला होतो. प्रकल्पाशेजारी असलेल्या २२ गावांमधील लोकांची लिफ्ट एरिगेशनला चालना मिळण्याकरिता या प्रकल्पाचीही वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या प्रकल्पाची उंची वाढवासी व लिफ्ट एरिगेशनच फायदा शेजारच्या तालुक्यासह या तालुक्यातील २२ गावांमधील लोकांना मिळावा याकरिता खा. भावना गवळी यांनी धरणाच्या भिंतीवर आंदोलन केले होते. तसेच सोनल प्रकल्पाची उंची वाढावी या संदर्भात माजी आमदार गजाधर राठोड यांनीही प्रश्न उचलला होता. भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेवरून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.