पोलिस पाटील पद चार वर्षापासून रिक्त

By Admin | Updated: October 2, 2014 01:01 IST2014-10-02T01:01:11+5:302014-10-02T01:01:11+5:30

हिवरापेन येथील पोलिस पाटलाचे पद ४ वर्षापासून रिक्त.

Police Patil has been vacant for four years | पोलिस पाटील पद चार वर्षापासून रिक्त

पोलिस पाटील पद चार वर्षापासून रिक्त

हिवरापेन (वाशिम): हिवरापेन येथील पोलिस पाटलाचे पद ४ वर्षापासून रिक्त असून हे पद लवकरच भरण्यात यावे अशी हिवरापेन येथील गावकर्‍याची मागणी आहे. हिवरापेन येथील पोलिस पाटील पद रिक्त असल्यामुळे या पदाचा कार्यभार हिवरापेन येथून जवळच असलेल्या देउळगाव बंडा येथे पोलिस पाटील सरनाईक यांचे कडे आहे देउळगाव हे गाव हिवरापेन येथून जवळपास ५ ते ६ किलोमीटर वरुन दाखले इतर कामासाठी देउळगाव येथे जावे लागते.
हिवरापेन येथील लोकसंख्या जवळपास १५00 ते २000 असून तेथील गावातील लहान मोठे वाद अनेक धार्मीक कामात तसेच पोलिस स्टेशनचे इतर कामे तसेच विद्यार्थ्यां व नागरिकांना महत्वाच्या कामाकरिता ओळखपत्र व दाखले मिळविण्याकरी मोल मजुरी पाडून देउळगाव बंडा येथे जावे लागते. तसेच गावातील शेतात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस पाटलाचे पद महत्वाचे आहे तंटामुक्त मोहीम ही महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे राबविली जात आहे याच्या सोबत गावातील शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस पाटील पद हे अती महत्वाचे आहे त्यामुळे हे पद ताबडतोब भरण्यात यावे अशी गावकर्‍याची मागणी आहे.

Web Title: Police Patil has been vacant for four years