शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात ८ वाहनांद्वारे घातली जाते गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:15 IST

Police Patroling in Washim वाशिम शहरामध्ये रात्रीच्या सुमारास एकूण ८ वाहनांद्वारे गस्त घातली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळवून चोरट्यांवर वचक बसविण्याकरिता, पोलीस प्रशासन चोख कर्तव्य बजावत आहे. दरम्यान, वाशिम शहरामध्ये रात्रीच्या सुमारास एकूण ८ वाहनांद्वारे गस्त घातली जाते. त्यासाठी ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. जुने शहरात जुन्या पद्धतीच्या इमारतींची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे. यासोबतच नव्याने आययूडीपी कॉलनी, सिव्हिल लाइन, लाखाळा, तिरुपती सिटी यासह विविध स्वरूपांतील वसाहती विकसित झाल्या असून, मोठमोठ्या घरांची संख्या वाढली आहे. या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित राहावे, रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांवर नियंत्रण मिळून चोरट्यांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने गस्तीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. गेल्या वर्षभरात ५० चोऱ्या, २५ घरफोड्याएकट्या वाशिम शहरात २०२० या वर्षांत एकूण ५० चोऱ्या आणि २५ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस प्रशासनाने वचक निर्माण केल्याने, या स्वरूपातील गुन्हेगारीचे हे प्रमाण तुलनेने कमी आहे. विशेष म्हणजे ५० चोऱ्यांपैकी ३८ चोऱ्यांचा; तर १८ घरफोडींचा तपास पूर्ण करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले.

संवेदनशील भागात पोलिसांची दैनंदिन गस्तवाशिम शहरातील सर्वच वसाहतींमध्ये रात्रीच्या सुमारास गस्त घालतात. त्यात विशेषत: संवेदनशील भागावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. वाशिम-अकोला मार्गावरील तिरुपती सिटी या वसाहतीमध्येही पोलिसांची रात्रीच्या सुमारास गस्त राहत असल्याची माहिती तेथे कार्यरत सुरक्षारक्षक राजू ठाकूर यांनी दिली. 

वाशिम शहरात ६ चारचाकी वाहनांवर २४ व ४ दुचाकी वाहनांवर ४ कर्मचारी दररोज रात्री गस्त घालण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवले जाते. लवकरच या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस