शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाशिम जिल्ह्यात सहा दिवसांत कोरोना बाधित रुग्णसंख्या ९०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:37 PM

CoronaVirus News काही दिवसांपासून रिक्त झालेले कोविड केअर सेंटरमधील बेडही हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे  संकट अधिक तीव्र झाले असून गेल्या सहा दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा ओलांडला आहे. यामुळे काही दिवसांपासून रिक्त झालेले कोविड केअर सेंटरमधील बेडही हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून डिसेंबर २०२० अखेर कोरोना रुग्णांचा आकडा सहा हजार ६६३ वर पोहोचला होता. दरम्यान, नव्या वर्षातील पहिल्या जानेवारी महिन्यात कोरोनाचे नवे ५०६ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे प्रमाण काहीसे कमी होऊन १५० च्या आसपास रुग्णसंख्या झाली; मात्र १४ फेब्रुवारीपासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १४ ते २० फेब्रुवारी या सात दिवसांत ३५८; तर २१ ते २७ फेब्रुवारी या सात दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ९७३ ने वाढलेली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्ण तयारीनिशी पुन्हा सज्ज झाली असून कुलूपबंद कोविड केअर सेंटरही सुरू झाले आहेत. रुग्णवाढीचा हा वेग यापुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याने नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता तोंडाला मास्क लावणे, सामाजिक व शारीरिक अंतर राखणे, स्वच्छतेचे निकष पाळून  कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

१०७० कोरोना बाधीत गृह विलगीकरणातकोविड केअर सेंटर आणि विविध शासकीय रुग्णालयांमध्ये ३५५ कोरोना बाधीत रुग्ण उपचारार्थ दाखल असून १०७० जण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. या रुग्णांवरही आरोग्य विभाग विशेष ‘वॉच’ ठेऊन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जात असून आवश्यक त्याठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णभरती करून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट तीव्र होत असून नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या