३00 हेक्टरवरील संत्रा उत्पादक संकटात

By Admin | Updated: November 30, 2014 23:57 IST2014-11-30T23:57:06+5:302014-11-30T23:57:06+5:30

फुटला नाही मृग बहार: हेक्टरी दोन लाख मदतीची मागणी.

Out of 300 hectares orange producers | ३00 हेक्टरवरील संत्रा उत्पादक संकटात

३00 हेक्टरवरील संत्रा उत्पादक संकटात

मुंगळा (वाशिम) : सर्वाधीक संत्रा उत्पादन घेणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांच्या ३00 हेक्टरवरील संत्रांच्या झाडाला अत्यल्प पावसामुळे मृगाचा बहार फुटलाच नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून झालेल्या नुकसानीपाई हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
संपूर्ण वाशिम जिल्ह्यात मुंगळा गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. या संत्रा उत्पादक गावातील शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान हे संत्रा उत्पादनावरच अवलंबून आहे. दरवर्षी जवळपास ६ ते ७ कोटीची उलाढाल एकट्या मुगळा गावात संत्रा उत्पादकांच्या शेतीतून होते. संत्राला येणार्‍या बहारामधील मृग बहार येण्यासाठी पावसाळ्य़ातील मृग नक्षत्रात पाउस पडणे आवश्यक असते. परंतू चालू खरीप हंगामात मृगात पाउसच न पडल्याने जवळपास ३00 हेक्टरवरील संत्रा पिकाला मृगाचा बहारच आला नसल्याची वस्तूस्थिती आहे. जून महिण्यात मृगाचा पाउस बरसल्यानंतर संत्रा पिकाला बहहार येण्यासाठी पोषक वातावरणची निर्मीती होते. चालू हंगामात मात्र अपूरा पाउस व वाढते तापमाण यामुळे मुगळा गावातील जवळपास ३00 हेक्टरवरली संत्रा बागांना मृगाचा बहार आलाच नाही. संत्रा बागांवर मोठय़ा प्रमाणात केलेला खर्च हा मृगाचा बहार आल्यानंतर वसुल होईल अशी आशा शेतकरी बाळगूण होते. परंतू अत्यल्प पावसामुळे संत्रा झाडांना मृगाचा बहारच न फुटल्याने संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी संत्रा बागेवर केलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दूबार, तिबार पेरणी अन् त्यानंतर मुख्य संत्रा पिकावर केलेला लाखोचा खर्च पाण्यात गेल्याने संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे नियोजन पूरते बिघडले आहे. शासनाने व कृषी विभागाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना किमान हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी ;संत्रा उत्पादक शेतक-यांनी केली आहे.

Web Title: Out of 300 hectares orange producers