शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांनी घेतला धसका

By admin | Updated: September 26, 2014 00:39 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशनाचा धसका, शासकीय वाहनांचा गैरवापरास लगाम.

वाशिम : शासकीय वाहनांचा वापर अधिकार्‍यांकडून खासगी कामासाठी केला जात असल्याचा लोकमतच्या वृत्ताचा जिल्हयातील अधिका-यांनी धसका घेतल्याचे चित्र आज २५ सप्टेंबर रोजी पहावयास मिळाले. वाशिम जिल्हा मुख्यालयी कार्यरत असणारे व दररोज बाहरेगावाहून अपडाउन करणारे अधिकारी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा वापर करीत असल्याबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातुन उघड केले होते. त्यामुळे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी एकही शासकीय वाहन बसस्थानक व रेल्वेस्थानकाकडे फिरकलेच नाही . आज रेल्वे येण्याच्या आधी व रेल्वे निघून गेल्यानंतरही लोकमतची चमू १५ मिनिटे तेथे थांबली होती. अधिका-याना ने आण करण्याकरिता शासकीय गाडयांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बुधवार २४ सप्टेंबर रोजी लोकमतने स्टिंग ऑपरेशन मोहीम राबवून शासकीय अधिकारी शासनाच्या गाडयाचा गैरवापर करीत असल्याचे बिंग फोडले होते. लोकमत चमुने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा धसका घेतला व दररोज दिमतीला असणार्‍या शासकीय गाडयांवर रेल्वेस्थानक व बसस्थानकावर घेण्यासाठी बोलवले नसल्याचे २५ सप्टेंबर रोजी लोकमत चमुच्या निदर्शनास आले. अधिकार्‍यांना शासकीय कामांना तसेच मिटींगला हजर राहण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करता येतो. मात्र वैयक्तिक अथवा खासगी कामांसाठी शासकीय वाहन वापरण्याचा अधिकार नाही. लोकमत चमुने राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनची आपण दखल घेतली असून आपल्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना वैयक्तिक किंवा खासगी कामासाठी शासकीय वाहन वापरु नये, अशा तोंडी व आपण लेखी सुचना दिल्या असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेखा मेंढे यांनी सांगीतले.