अधिकारी बदलले मात्र फलक पूर्वीचेच

By Admin | Updated: November 30, 2014 23:56 IST2014-11-30T23:56:20+5:302014-11-30T23:56:20+5:30

कारंजा ग्रांमीण रुग्णालयातील प्रकार.

The official changed but the board was just before | अधिकारी बदलले मात्र फलक पूर्वीचेच

अधिकारी बदलले मात्र फलक पूर्वीचेच

कारंजा लाड (वाशिम): ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर उपचारासाठी येणार्‍या रुग्णांवर योग्यपद्धतीने उपचार व्हावेत म्हणून रुग्णसेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत फेरबदल झाल्यानंतर रुग्णालयात लावलेल्या समितीच्या फलकावरही बदल होणे आवश्यक आहे; परंतु कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात स्थापन रुग्ण कल्याण समितीमध्ये अध्यक्षपदावर नियुक्त असणारे पं.स.चे गटविकास अधिकारी अशोक पराते यांची तीन वर्षांपूर्वी बदली झाली. या समितीचे सदस्य असलेले तहसीलदार मोहन जोशी, मुख्याधिकारी गीता वंजारी, बांधकाम विभाग उपअभियंता आर. एम. जोशी आदिंच्या बदल्या झाल्या; परंतु रुग्ण कल्याण समितीच्या फलकावरील त्यांची नावे मात्र आजही कायमच असल्यामुळे रुग्णांना स्वत:च्या समस्या मांडण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याशिवाय याच रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदी असलेले तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांचेच नाव आजही अभ्यागत समितीच्या फलकावर कायम असून, कित्येक दिवसांपासून संबंधितांचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The official changed but the board was just before