शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील आवश्यक घटक बेपत्ता!

By admin | Updated: September 12, 2014 22:55 IST

मानोरा तालुक्यातील शाळांमधील पोषण आहारावितरणामध्ये अनेक त्रुटी.

मानोरा: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आहारातील आवश्यक घटकच बेपत्ता झाल्याचे दिसत असून, पोषण आहाराचे कंत्राट घेणारे व्यक्ती केवळ मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे योजनेचे तीन तेरा वाजल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगिण पोषण आहार मिळावा या हेतुने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. अतिशय उदात्त हेतुने सुरू केलेल्या या योजनेलाही आता भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. त्यामुळे या योजनेच्या मुळ हेतुलाच हरताळ फासल्या जात आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी शालेय पोषण आहार योजना अतिशय चांगली आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी प्रत्येकी १0 ग्राम तांदुळ व २0 ग्राम कडधान्य आणि ५0 ग्राम भाजीपालाआणि सहावी ते आठवीच्या मुलांसाठी १५0 ग्राम तांदुळ, ३0 ग्राम कडधान्य व ७५ ग्राम भाजीपाला अशी तरतुद प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला आहे. सोबतच नागरी भागामध्ये या आहारासह इडली-सांबार मसाला इडली-सांबार तसेच सर्व डाळी वापरून पदार्थ बनवून विद्यार्थ्यांना देण्याची तरतुद आहे. आठवड्यातून किमान एकदा मुळे, बिस्कीट, दुध, चिक्की, राजगुरा लाडू, गुळ शेंगदाने आदी पूरक आहार पुरवायला आहे. परंतु बहुतांश शाळामध्ये हा आहार पुरविलाच जात नाही. या बाबतची संपूर्ण जबबाबदारी मुख्याध्यापकांची असते. अनेक मुख्याध्यापकांना हा अध्यादेश सुद्धा माहित नसल्याने ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला सांगण्यावरून खिचडी व डाळीची आमटी एवढाच आहार विद्यार्थ्यांना पुरवितात. कोणत्याही शाळेत आमदरीमध्ये पालेभाज्यांचा वापर केला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार २५ विद्यार्थी असलेल्या शाळेपासून एक हजार विद्यार्थी असलेल्या शाळांना एका मदतनिसाची नेमणूक करून घ्यावयाची आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार मानधनाची व्यवस्था आहे. परंतु अनेक ठिकाणी मर्जीप्रमाणे मानधन देऊन उर्वरित रक्कम हडप केल्या जाते. याकडे संबंधित विभागाकडून लक्षच दिल्या जात नाही. शासनाने जिल्हा परिषद शाळेवरील शिपाई, परिचर ही पदे कमी करून मदतनिसाची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु अनेक ठिकाणी ही नियुक्तीच केल्या जात नाही. याबाबतची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाला असतानाही शाळांच्या या कारभाराकडे दुर्लक्ष केल्या जाते. शालेय पोषण आहारासाठी शासनाने ठरवून दिल्यानुसार धान्यपुरवठा व्हायला पाहिजे. परंतु गत ६ महिन्यापासून त्या प्रकारचा पुरवठा होत नाही. मिळेल त्या धान्य पुरवठय़ातून पोषण आहार देण्यात येतो. चांगला आहार मिळावा याकरीता प्रयत्न असल्याचे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगीतले.