शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:05 PM

वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.

- नंदकिशोर नारेवाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राकाँं आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ८ एप्रिल रोजी वाशिम येथे आले असता ते बोलत होते.पुढे बोलतंना धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, देश बदल रहा है, पंरतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. उलट खोटी आश्वासने व फसव्या घोषणा करुन महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बरोजगारी वाढली आहे, असे सांगून जनतेला प्रश्न केला की, मोदी सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात एक तरी व्यक्ती सांगा कोणाला फायदा झाला. त्यावेळी जनतेतून जोराने ‘नाही’ अशा घोषणा देण्यात आल्यात. काँग्रेसचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी महागाई आटोक्यात होती. सरासरी ५० रुपये पेट्रोलचे दर होते. आज हे भाव सरासरी ८० रुपयावर गेले आहेत. एका व्यक्तिला दररोज समजा एक लिटर पेट्रोल लागत असेल तर ५ वर्षात मोदी सरकारने तुमच्या खिशातील किती रुपये नेलेत. हे घरी गेल्यानंतर हिसोब करुन मला सांगा. गॅस सिलिंडरची त्यावेळीची किंमत व आजची किंमतमधील तफावत पहा महागाई कोणी वाढविली हे कोणाला सांगण्याची गरज पडणार नाही. एका व्यक्तिमागे २ लाख रुपयाची लूट मोदींनी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस - राष्टÑवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्यावेळी कोणाला रांगेत उभे केले नाही.  यावेळी त्यांनी नोटबंदी, स्कील इंडिया, मेकिंग इंडिया आदींवर घणाघाती टीका केली.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमDhananjay Mundeधनंजय मुंडेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक