शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

मालेगाव व मानोरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; १0 जानेवारीला मतदान.

मालेगाव/मानोरा : बहुप्रतीक्षेत असलेला मालेगाव व मानोरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. १0 डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असून, १0 जानेवारी २0१६ रोजी मतदान होणार आहे. मालेगाव व मानोरा ग्रामपंचायतचे रुपांतर नगर पंचायतमध्ये झाल्यानंतर आरक्षण, वार्ड रचना आदी सोपस्कार पार पडले. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला. जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ८ डिसेंबर २0१५ अशी आहे. नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे १0 डिसेंबर ते १७ डिसेंबर या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. १२ व १३ डिसेंबरला नामनिर्देशनपत्र देण्यात व स्वीकारली जाणार नाहीत, तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी १८ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपिल नसेल तेथे) २८ डिसेंबर असा आहे. अपिल असलेल्या ठिकाणी, निर्णय लागल्याच्या तारखेनंतर तिसर्‍या दिवशी किंवा तत्पूर्वी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक राहील. मतदान केंद्राची यादी ४ जानेवारी २0१६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. १0 जानेवारी २0१६ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतमोजणी होणार आहे. ११ जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.