शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला पालिकेचा बुलडोजर

By admin | Updated: November 19, 2014 02:27 IST

वाशिम शहरातील काहीभागात अतिक्रमण निमुर्लन मोहीम, अवैध बांधकाम जमीनदोस्त.

वाशिम : येथील संतोषी माता नगरमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरूंद झाला होता. रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये बहुतांश श्रीमंतांच्याच घरावर जेसीबी चालविण्यात आला. यामध्ये अंदाजे ६0 ते ७0 लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या विकास आराखड्यामध्ये संतोषी माता नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, अभियंता विनय देशमुख यांच्यासह न.प. च्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी रस्त्याचे मोजमाप केले. यामध्ये तेथील बहुतांश रहिवाशांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरासरी १0 फूट अतिक्रमण केल्याचे आढळून आले. नगर विकास आराखड्यानुसार रस्ता हा नाली बांधकाम वगळता ३0 फूट रूंदीचा होणे अपेक्षित आहे; मात्र नगर परिषदेने २५ फूट रस्ता मोकळा करण्यासाठी रहिवाशांना विनंती केली. रहिवाशांनी स्वत:हून नगर परिषदेला अतिक्रमण काढण्यास सहमती दिली. या अतिक्रमणामध्ये रामा जाजू, रामकृष्ण कालापाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, शैलेश जैन, बबन देवकर, अभिलाष जैन, विवेक साहू यांच्यासह अनेक रहिवाशांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असताना तेथील रहिवाशांनी नगर परिषदेला विकास कामासाठी पूर्ण सहकार्य केल्यामुळे मुख्याधिकारी वसंत इंगोले व अभियंता विनय देशमुख यांनी रहिवाशांचे कौतुक केले. शहरामधील सर्व नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका ठेवल्यास शहराचे सौंदर्यीकरण करण्यास जास्त कालावधी लागणार नाही. अशा प्रतिक्रियाही घटनास्थळी उमटल्या.