शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
5
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
6
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
9
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
10
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
11
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
12
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
13
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
16
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
17
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
18
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
19
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
20
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यावर हल्ला

By admin | Updated: September 10, 2015 02:14 IST

कारंजातील पेट्रोल पंपनजीकची घटना; गुन्हा दाखल.

कारंजा लाड (जि. वाशिम): वीज वितरण कंपनीचे कारंजा येथील उपकार्यकारी अभियंता अजय महादेवराव पिंगे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अभियंता पिंगे जखमी झाले असून, त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपजवळ घडली.
वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अजय महादेवराव पिंगे (४२) हे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरातील काण्णव जीनमध्ये असलेल्या कार्यालयातून जेवण करण्यासाठी मंगरूळपीर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपनजीक असलेल्या हॉटेल तिरूमला येथे गेले होते. तेथून परत येत असताना सावरकर चौक मार्गे महावीर ब्रह्मचर्य आश्रममधील निवासस्थानी चालले होते.
दरम्यान, मार्गात पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूूला असलेल्या झुडुपातून अचानक एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या एमएच ३0 पी २३२0 क्रमांकाच्या धावत्या कारसमोर आला व काठी मारून समोरील हेडलाईट फोडला. कार थांबताच लगेच कारच्या दोन्ही बाजूंनी दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी काठीने व फायटरसारख्या शस्त्रांनी पिंगे यांच्या पाठ, छाती व हातावर हल्ला केला. या घटनेत उपकार्यकारी अभियंता पिंगे जखमी झाले. त्यानंतर तिन्ही अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी अवस्थेतील पिंगे यांनी घटनेची माहिती सहायक अभियंता सुशीलकुमार शुक्ला यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यांनी वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले व तत्काळ पिंगे यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता अजय पिंगे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात जमादार सुधाकर पवार करीत आहेत.