दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग; काकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:27 IST2018-12-24T16:27:23+5:302018-12-24T16:27:58+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : दहावीच्या वर्गात शिकणाºया येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा १९ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली.

दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग; काकास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : दहावीच्या वर्गात शिकणाºया येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा १९ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली. याप्रकरणी जाब विचारणाºया पिडीतेच्या काकालाही आरोपी लोटलाट करून शिवीगाळ केली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर येथील १६ वर्षीय विद्यार्थीनी घरात एकटी असताना सय्यद असलम सय्यद सादीक (१९) याने घरात प्रवेश करून वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला. आरडाओरड केली असता पिडीतेचे काका मदतीसाठी धावून आले. आरोपी घरातून पळून जात असताना त्याला पकडून जाब विचारला असता काकालाही लोटलाट करून शिवीगाळ केली तसेच जिवाने मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. आई-वडील घरी आल्यानंतर पिडीतेसह सर्वांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३५४, ३५४ ड, ४५२, ३२३, ५०४, ५०६, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.