शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अंगणामधील रोपे निर्मितीतून उभारली आधुनिक रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

वाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन व तुरीचे पीक घेत असताना मंगरूळपीरनजीक ...

वाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन व तुरीचे पीक घेत असताना मंगरूळपीरनजीक असलेल्या जांब शिवारात शेडनेट व पॉली हाऊसच्या माध्यमातून सरला मोहिते या सुशिक्षित शेतकरी महिलेने नावीन्यपूर्ण साई रोपवाटिकेच्या माध्यमातून भाजीपालावर्गीय व पपई रोपांची निर्मिती करून जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकाचा मार्ग दाखविला आहे.

सरला मोहिते यांची शेलूबाजारजवळ असलेल्या घुगरी या गावी ५ एकर शेती. सरला मोहिते यांचे पती रमेश मोहिते हे मानोरा तालुक्यातील मानोली येथे खाजगी शाळेत शिक्षक आहेत. सरला यांना शेती करण्यासाठी त्यांच्या पतीचे प्रोत्साहन आणि पाठबळदेखील मिळाले. सरला मोहिते यांचे शिक्षण बी.ए. पदवीपर्यंत झाले. पतीच्या अर्थार्जनात आपलाही वाटा असला पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटायचे. रोपे निर्मिती करण्याची त्यांची आवड त्यांना एक चांगला आदर्श शेतकरी बनवेल, असे त्यांना कधी वाटले नाही. सन २००५ मध्ये मंगरूळपीर येथील वैष्णवीनगरात घरी असलेल्या खुल्या जागेत सन २००५-०६ ते सन २००८-०९ या कालावधीत पपईची रोपे तयार करून विक्री केली. रोपे विक्री व्यवसायात आपण चांगली प्रगती करू शकतो, असा विश्वास पपईच्या रोपे निर्मितीतून निर्माण झाला. त्यामुळे मंगरूळपीरच्या पश्चिम दिशेला असलेल्या जांब शिवारात सन २००९ मध्ये २ एकर पडीक जमीन विकत घेतली. या जमिनीवर चांगली मशागत करून विविध प्रकारच्या रोपे निर्मितीला सुरुवात केली. त्यानंतर तिथेच २ एकर शेती सन २०१० मध्ये खरेदी केली. सन २०१२ मध्ये पुन्हा एक एकर व सन २०१९ मध्ये एक एकर शेती घेतली. अशी एकूण ६ एकर शेती जांब शिवारात खरेदी केली. सरला मोहिते यांनी साई रोपवाटिकेच्या माध्यमातून सन २००५ पासून रोपे तयार करण्याला सुरुवात केली. घरी पूर्वी थोडीफार असलेल्या शेतातून आणि घरी असलेल्या मोकळ्या जागेत रोपे तयार करून घरच्या अर्थकारणात आपलाही वाटा असला पाहिजे, या जाणिवेतून सरला मोहिते यांनी साई रोपवाटिकेतून विविध रोपांची निर्मिती करून नवीन असा शेतीपूरक व्यवसाय सुरू करून अनेक महिला शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

----

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माेहिते यांना राज्य शासनाचा पुरस्कार

कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने सरला रमेश मोहिते यांना सन २०१९-२० या वर्षाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने १ जुलै २०२१ रोजी कृषीदिनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गौरविण्यात आले आहे.

----

लाखाे रुपयांचे अनुदान

सन २००६ मध्ये तयार केलेली तायवान पपईची रोपे बघून ६५ हजार रुपयांची तायवान पपईची रोपे तयार करण्याची त्यांना ऑर्डर मिळाली. सन २०१२ मध्ये कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजनेतून २० गुंठे जमिनीवर ७ लक्ष रुपयांतून शेडनेट तयार करण्यात आले. याकरिता ३ लक्ष रुपये अनुदान मिळाले. सन २०१४ मध्ये संरक्षित शेती योजनेतून २० गुंठे जमिनीवर १६ लक्ष रुपयांचे पॉली हाऊस तयार करण्यात आले. याकरिता ८ लक्ष रुपये अनुदान मिळाले.