मेडशी येथे शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST2021-09-19T04:42:15+5:302021-09-19T04:42:15+5:30

मेडशी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता सिरसाट, सरपंच शेख जमीर शेख गनिभाई, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव ...

Meeting of the Peace Committee at Medashi | मेडशी येथे शांतता समितीची बैठक

मेडशी येथे शांतता समितीची बैठक

मेडशी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता सिरसाट, सरपंच शेख जमीर शेख गनिभाई, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, शौकत पठाण यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गणेश विसर्जन सोहळ्यात केवळ चारजणांनी सहभागी व्हावे, ढोल, ताशे, वाद्यांचा वापर टाळून शांततेत विसर्जन मिरवणूक काढावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता सिरसाट यांनी केले. यावेळी पोलीसपाटील अनिता चोथमल, ताजने, तलाठी दत्तात्रय घुगे, शिवसेना तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे, गणेश मंडळाचे प्रशांत मेडशीकर, संजय करवते, गजानन शिंदे, गणेश शेंडोकार, सचिन तोडकर, शिवाजी शिंदे, सचिन मुंडे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेडशीकर, कैलास ढाले, उमेश तायड़े, सुभाष तायड़े, अनंता घुगे, पोलीस अमोल पाटील, इंगोले, आदींची उपस्थिती होती. विनोद तायडे यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of the Peace Committee at Medashi