शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी वातावरण अनुकूल !

By admin | Updated: November 14, 2014 01:17 IST

सहकार विभागाकडून विलंब; शेतकर्‍यांची गैरसोय.

अकोला : राज्य शासनाच्या सहकार विभागाने संचालक मंडळाची मुदत संपलेल्या राज्यातील शंभर बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत; पंरतु या समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाला विलंब होत असल्याने संचालकांमध्ये नाराजी तर आहेच, शिवाय सध्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक सुरू झाल्याने शेतकर्‍यांची कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.राज्यातील शंभरावर बाजार समितीत्यांच्या संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वीच संपली होती; तथापि गतवर्षीची अतवृष्टी आणि त्यांनतर लागलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमुळे बाजार समित्यांची निवडणूक सहकार विभागाने पुढे ढकलली होती. त्यामुळे शासनाने काही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले होते. या निर्णयाला बाजार समित्यांनी न्यायालयात आव्हान दिल्याने, काही काळ विद्यमान संचालक स्थानापन्न होते. अकोल्याच्या बाजार समितीनेही याबाबत मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. त्यामुळे या बाजार समितीवर पुन्हा संचालक मंडळ आरू ढ झाले होते. हा स्थगनादेश अल्प कालावधीसाठी असल्याने, सहकारी उपनिंबधक कार्यालयाने पुन्हा प्रशासकाची नेमणूक केली; पंरतु शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्याने, शासनाने अकोला बाजार समितीसह राज्यातील इतर बाजार समित्यांवर संचालकांचे अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते. या मंडळाच्या अध्यक्षपदी बाजार समित्यांच्या सभापतींची निवड केली होती. नवे सरकार येताच सहाकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व बाजार समित्यावंरील अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त केले असून, नव्याने प्रशासक नेमणुकीचे आदेश काढले आहेत. यातील बहुतांश बाजार समित्यांवर बुधवार , १२ नोव्हेंबर रोजीच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.एक वर्षापासून शासनाकडून बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी विलंब होत असून, अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. खरीप हंगाम आणि शेतमालाची बाजारातील आवक बघता, निवडणुका होईपर्यत ही मंडळं कार्यरत ठेवण्याची गरज होती; पण मंडळ बरखास्त केल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांनी स्पष्ट केले.