झेंडू फुलांनी दिला शेतकऱ्याला आर्थिक आधार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:37+5:302021-09-12T04:47:37+5:30

भर जहगीर परिसरातील मांगवाडी, मांडवा, कुऱ्हा, जवळा, मोरगव्हाण, चाकोली, मोप, बोरखेडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये गुंठेवारी, तर ...

Marigold flowers gave financial support to farmers ..! | झेंडू फुलांनी दिला शेतकऱ्याला आर्थिक आधार..!

झेंडू फुलांनी दिला शेतकऱ्याला आर्थिक आधार..!

भर जहगीर परिसरातील मांगवाडी, मांडवा, कुऱ्हा, जवळा, मोरगव्हाण, चाकोली, मोप, बोरखेडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये गुंठेवारी, तर झेंडू फुलांची लागवड केलेली आहे.

मोरगव्हाण येथील अनेक शेतकऱ्यांनी अवघ्या दहा-बारा गुंठ्यावर झेंडू फुलांचे उत्पन्न घेतले. बारा गुंठे क्षेत्रात झेंडू लावगड ते उत्पन्नापर्यंत १२ ते १४ हजारांचा खर्च येतो. यामध्ये गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरी, दसरा, दिवाळी अशा उत्सवाला झेंडू फुलांचे चार ते पाच तोडे घेतले जातात. हल्ली फुलांचे दर ३० रुपये प्रति किलोवर असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

००००००००००००००००

कोट: अवघ्या दहा, बारा गुंठे क्षेत्रातील झेंडू फूल शेतीमधून लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे फूल शेतीकडे आमचा कल वाढला असून, इतरही अनेक शेतकरी कोरोनातील मरगळ झटकून फूल शेतीकडे वळले आहेत.

-शंकर कोकाटे,

फूल उत्पादक शेतकरी

कोट: यंदा झेंडू फुलांचे समाधानकारक उत्पन्न मिळत असून, फुलांना ३० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. यंदा अहमदनगर जिल्ह्यातील आळेफाटा येथे गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर फुलांची ठोक विक्री केली आहे.

-प्रल्हाद कोकाटे, झेंडू उत्पादक

Web Title: Marigold flowers gave financial support to farmers ..!