शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मैराळडोह ग्रामपंचायतचे जळालेले वादग्रस्त ‘रेकॉर्ड’ सापडले!

By admin | Updated: June 1, 2017 01:55 IST

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील तत्कालीन ग्रामसेवक संजय शेळके यांनी १० मार्च रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील तत्कालीन ग्रामसेवक संजय शेळके यांनी १० मार्च रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पोलिसांनी जप्त केलेले ग्रामपंचायतचे रेकॉर्ड ‘जळाले’ असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने कळविले होते. सदर रेकॉर्ड आता सापडल्याने संबंधित कर्मचाऱ्याचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला. दरम्यान, ३१ मे रोजी न्यायालयाचे आदेशाप्रमाणे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सदर दप्तर सुपूर्द केले.सन २०१६ मध्ये मैराळडोह (ता. मालेगाव जि. वाशिम ) येथील ग्रामसेवक संजय शेळके कर्तव्यावर होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून ग्रामविकासाची खोटी कामे दाखवून देयके काढली, यासह विविध गैरप्रकाराचा ऊहापोह त्यांनी ‘सुसाईट नोट’ मध्ये केला होता. त्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने घटनेचे तपास अधिकारी बहुरे यांनी मैराळडोह ग्रामपंचायतचे संपूर्ण रेकॉर्ड जप्त केले होते. मागील एक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये रेकॉर्ड नसल्यामुळे सन २०१५-१६ ची कर आकारणी, गावातील दाखले, घराची कर पावती आदी महत्त्वाचे दस्तावेज नागरिकांना देता येत नव्हते. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याने सदर रेकॉर्ड जळाल्याचे पंचायत समितीला कळविले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दप्तर मिळावे, यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाने ११ मार्च २०१७ रोजी सुनावणी केली. या सुनावणीमध्ये विद्यमान न्यायालयाने वाशिम शहर पोलिसांना जप्त केलेले रेकॉर्ड परत करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची भेट घेऊन जप्त केलेल्या रेकॉर्डबद्दल माहिती दिली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी तत्काळ रेकॉर्डचा तपास करण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे यांना सूचना केल्या. या सूचनेनुसार चक्रे, तत्कालीन तपास अधिकारी बहुरे व ठाणेदार शिरीष मानकर यांनी रेकॉर्ड रूमची पुन्हा पाहणी केली असता एका कपाटाच्या मागे ‘रेकॉर्ड’ मिळून आले. सदर रेकॉर्ड ३१ मे रोजी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी चक्रे, ठाणेदार मानकर यांनी ग्रामविकास अधिकारी भुरकाडे यांचेकडे सुपूर्द केले.