शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा राजीनामा

By admin | Updated: March 19, 2015 01:34 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकारणात खळबळ.

वाशिम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह ३0 पदाधिकार्‍यांनी एकाच दिवशी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढय़ा पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. वाशिम येथील जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेच्यावतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला व तो त्यांनी स्वीकृत केला; तसेच जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा पदाधिकार्‍यांच्या कारणाशी सहमत होऊन आपला राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला. स्थानिक जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, शाखा प्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी गत ९ वर्षात पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये ग्रामीण महाराष्ट्राबाबत विशेष करून विदर्भाच्या सिंचनाबाबत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विदर्भाचा सर्वांगीण विकास याबाबत कुठलेही ठोस धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. पक्ष हा केवळ मोठय़ा शहरांच्या संबंधितच विचार करीत असून, ग्रामीण महाराष्ट्राबाबत अक्षम्य उदासीन असल्याचे बोलून यापुढे पक्षामध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे जिल्हाध्यक्षांना सांगितले. जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून लेखी सुचित करण्याचे सांगितले. उपस्थित पदाधिकारी यांनी लेखी राजीनामा देऊन पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याच्या निवेदनावरून जिल्हाध्यक्ष यांनी सवार्ंचे राजीनामे स्वीकारले. यावेळी राजे यांनी पदाधिकार्‍यांना पक्षात काम करण्याची विनंती केली असता, पदाधिकार्‍यांनी नकार दिला; तसेच पदाधिकारी यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या कारणाचा विचार करता जिल्हाध्यक्ष म्हणून पदाधिकार्‍यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे म्हणून जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा आपला राजीनामा पाठविला. एकाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याची जिल्हय़ातील राजकारणातील ही पहिली घटना असल्याचे म्हटल्या जात आहे.