शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार?

By नंदकिशोर नारे | Updated: November 8, 2024 06:04 IST

Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारेवाशिम - जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे.

रिसाेड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून अमित झनक (काॅंग्रेस), महायुतीकडून भावना गवळी (शिंदेसेना) व अपक्ष उमेदवार माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. गत २००९ व २०१९ च्या निवडणुकीतही अमित झनक व अनंतराव देशमुख यांच्यातच लढत झाली हाेती. यावेळी भावना गवळी निवडणूक रिंगणात उतरल्याने पूर्णपणे समीकरणे बदललेली दिसून येत आहेत. भावना गवळी व काॅंग्रेसचे झनक दाेघेही पाटील समाजाचे असून, त्यांच्या मताचे विभाजन हाेण्याची दाट शक्यता आहे. अनंतराव देशमुख भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक हाेते; परंतु उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत..

मतदारसंघातील कळीचे मुद्दे- मतदारसंघामधील रस्त्याची कामे न झाल्याने मतदारांचा राेष कायम आहे. या निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचा मुद्दा कळीचा ठरू शकताे.-रिसाेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी नसल्याने राेजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. एमआयडीसी व राेजगाराचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरू शकताे.- मतदारसंघातील पैनगंगा नदीवरील बॅरेजसचा रखडलेला प्रश्न निकाली न निघाल्याने शेतकऱ्यांसमाेर सिंचनाच्या अडचणी आहेत. हा मुद्दा निवडणुकीत उचलल्या जाऊ शकताे.- क्रीडा संकुल नसल्याने पाेलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह खेळाडूंना पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत. हा मुद्दा निवडणुकीत उपस्थित हाेऊ शकताे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४risod-acरिसोडBhavna Gavliभावना गवळीAmit Jhankअमित झनकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस