शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी 'हा' अवलिया करतोय १६ वर्षांपासून राज्यभर भ्रमंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:42 PM

पुण्यातील नंदकुमार बर्गे नामक एक युवक गत १६ वर्षांपासून दुचाकीने दरवर्षी एका जिल्ह्याची भ्रमंती करून महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करित आहे.

वाशिम : ‘जय महाराष्ट्र’, ‘माझा महाराष्ट्र’, असे म्हणत असताना अनेकांना स्वत:च्या जिल्ह्याशिवाय अन्य जिल्ह्यांची साधी माहिती देखील नसते. हीच बाब खटकल्याने पुण्यातील नंदकुमार बर्गे नामक एक युवक गत १६ वर्षांपासून दुचाकीने दरवर्षी एका जिल्ह्याची भ्रमंती करून महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करित आहे. यंदा त्यांनी गणेशोत्सवात वाशिम जिल्ह्यातील गावांना भेट देऊन महाराष्ट्र भ्रमंतीची १६ वी फेरी पूर्ण केली.

१०४ लघू चित्रपट निर्मिती करणारे तसेच ३६२३ एकपात्री प्रयोगांमध्ये सहभागी होऊन नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या नंदकुमार बर्गे हे आपल्या दुचाकी वाहनाने दरवर्षी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला भेट देऊन तेथील संस्कृती जाणून घेतात. दिवसभर पर्यटन आणि रात्रीच्या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीने विनोदी कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्यास त्यामाध्यमातून मिळणाºया मानधनातून प्रवासखर्च भागविला जातो, असे बर्गे सांगतात. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, असाच आहे. सामाजिक विषयांवर जनजागृती!दरवर्षी दुचाकी वाहनाने महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची भ्रमंती करण्याची परंपरा नंदकुमार बर्गे यांनी यंदाच्या १६ व्या वर्षीही कायम ठेवली आहे. प्रवासादरम्यान स्त्री भ्रूण हत्या, वृक्षलागवड, नेत्रदान, रक्तदान, अवयवदान यासह अन्य सामाजिक विषयांवर ते प्रबोधन करतात.

टॅग्स :washimवाशिमPuneपुणे