शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांअभावी गावखेड्यातील कायदा-सुव्यवस्था विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

वाशिम: जिल्ह्यात तब्बल २२९ पोलीस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलीस पाटलांवर दोन ते तीन गावांचा प्रभार देण्यात आला ...

वाशिम: जिल्ह्यात तब्बल २२९ पोलीस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलीस पाटलांवर दोन ते तीन गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस पाटीलच नव्हे, तर ग्रामस्थांनाही कमालीचा अडचणी येत असून, कायदा-सुव्ववस्था विस्कळीत होत आहे.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही. वाशिम जिल्ह्यात एकूण ६६३ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४३४ पदे भरली; तर २२९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलीस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलीस पाटलांची सर्वाधिक पदे ही वाशिम उपविभागात रिक्त आहेत.

००००००००००००

बॉक्स:

तुटपुंज्या मानधनावर बोळवण

ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलीस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, अवघ्या ६५०० रुपये देऊन तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलीस पाटलांची बोळवण करीत आहे.

००००००००००००

बॉक्स:

सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांचा आलेख चढताच

जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये पोलीस पाटील पदभरतीतून अनेक रिक्त पदांची समस्या निकाली लागली होती. आता सेवानिवृत्तीमुळे पदे रिक्त होत असताना पद भरती बंद असल्याने रिक्त पदांचा आलेख चढताच आहे.

०००००००००००००००००

चार महिन्यांपासून मानधनही नाही

पोलीस पाटलांची २२९ पदे रिक्त असल्याने या गावांचा अतिरिक्त प्रभार इतर पोलीस पाटलांना देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले, परंतु हे काम करीत असताना त्यांना आवश्यक असलेले मानधन मात्र वेळेत देण्याची तसदी घेण्यात आली नसून, जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांचे मानधन रखडले आहे.

०००००००००००००००००