शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा : निष्ठावंताच्या मनसुब्यावर पाणी फिरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:24 IST

प्रमुख पक्षाचे उमेदवार अडचणीत येणार असून, ही फळी जोडायची कशी, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत आपला हेतू साध्य करण्यासाठी पक्षांतर करणाऱ्या संधीसाधूंना तिकिट देऊन निष्ठावंतांच्या मनसुब्यावर घाव घालण्याचा प्रकार कारंजा मतदारसंघात घडला आहे. हा प्रकार आता प्रमुख पक्षांच्या ऊमेदवारांनाच आता भारी पडणार आहे.कारंजा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी आमदार प्रकाश डहाके, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. राम चव्हाण, तर बसपाकडून मो. युसूफ पुंजानी हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात जवळपास प्रत्येकच उमेदवार पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी धडपडत होता. त्यात काही निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही समावेश होता. भाजप वगळता इतर सर्वच पक्षात ही बाब पाहायला मिळाली. त्यातही काही महिन्यांपूर्वी माजी आमदार प्रकाश डहाके यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याच्या आणि शिवसेनेचे तिकिट त्यांना मिळण्याच्या आशेने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तथापि, कारंजा मतदारसंघ भाजपाला सुटला आणि प्रकाश डहाके यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यापेक्षा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये पुनर्प्रवेश करीत उमेदवारीही मिळविली, तर भारीपची महत्त्वाची पदे सोडूनही तिकिटापासून ‘वंचित’ राहिलेले मो. युसूफ पुंजानी यांनी बसपाचे तिकिट मिळविले. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीने डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी माजी जि.प. सदस्य रणजीत जाधवही इच्छूक होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. श्याम जाधव यांनी तिकिटासाठी खूप प्रयत्न केले होते, तर बसपाकडूनही निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छूक होते. पक्षाच्या हितासाठी झटणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी प्रवेश घेतलेल्यांना तिकिट बहाल करून पक्षश्रेष्ठींनी इच्छुकांच्या मनसुब्यावरच घाव घातला आहे. आता हे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी पूर्ण ताकदीनिशी कार्य करण्याची शक्यता मुळीच राहिली नाही. यामुळे प्रमुख पक्षाचे उमेदवार अडचणीत येणार असून, ही फळी जोडायची कशी, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकणार आहे.

आठ अपक्ष रिंगणातकारंजा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून प्रमुख उमेदवारांसह एकूण ११ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. तथापि, त्यापैकी ८ उमेदवारांनीच निव्वळ अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश डहाके यांनी अर्ज दाखल केला असताना याच पक्षाकडून पूर्वी माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही अर्ज दाखल केला, तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karanja-acकरंजा