शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीमुळे खदान, स्टोन क्रशरधारकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 19:14 IST

Washim News : पहिल्या दिवशी ११ ठिकाणी तपासणी झाल्याने खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले आहेत.

वाशिम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरून खदान, क्रेशरची तपासणी मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ११ ठिकाणी तपासणी झाल्याने खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ठोस कारवाई होणे आणि तपासणी मोहिमेत सातत्य ठेवावे, असा सूर तक्रारदारांसह नागरिकांमधून उमटत आहे.जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवित तपासणीची मोहिम हाती घेतली. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय भरारी पथकाने वाशिम तालुक्यातील तोंडगाव, तामसाळा व हिस्से बोराळा येथील ११ खदान, क्रेशरची अचानक तपासणी केली. यामुळे खदान, क्रेशरधारकांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात सर्वत्रच ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तपासणी झाल्यानंतर नियमाचा भंग झाल्याचे निदर्शनात आल्यास संबंधितांविरूद्ध कारवाई केली जाईल, असे अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी स्पष्ट केले. पहिल्या दिवशी तपासणी केलेल्या ११ प्रकरणांत नेमकी काय कारवाई होणार, याकडे तक्रारदारांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. या बाबींची होणार तपासणीपरवाना दिनांकापासून आतापर्यंत किती प्रमाणात उत्खनन केले आहे, उत्खननाच्या अनुषंगाने स्वामित्वधनाचा किती भरणा केला आहे तसेच ईटीएस मशीनद्वारे खदानीची मोजणी झाली असल्यास त्याची प्रत व ब्लास्टिंग ज्या व्यक्ती मार्फत करण्यात येते, त्या व्यक्तीच्या परवान्याची प्रत मागितली जाणार आहे.

 औपचारिकता म्हणून मोहिम नको !गौण खनिजाचे अवैध उत्खननप्रकरणी खदान व क्रेशरची तपासणी सुरू करण्यात आली. तपासणी मोहिमेत सातत्य असायला हवे तसेच केवळ औपचारिकता म्हणून तपासणी मोहिम नको, असा सूर तक्रारदारांसह नागरिकांमधून उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिम