शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी

By admin | Updated: November 29, 2014 23:39 IST

पालक सचिवांनी मंगरूळपीर तालुक्यातील दोन गावांचा घेतला आढावा.

मंगरूळपीर (वाशिम) : यावर्षीच्या अल्प पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले ही बाब लक्षात घेऊन मदत व पुनर्वसन मंत्रालय सचिव तथा वाशिम जिल्हा पालक सचिव यांनी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांशी चर्चा केली.अंबापूर येथील चंद्रभागा मनवर व बिटोडा भोयर येथील शेतकरी आनंदा भोयर, रामराव भोयर, रामदास भजने यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. या प्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची वाशिम जिल्हा सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली असताना शेतकरी म्हणाले, सोयाबीनचे पीकाचे पाण्याअभावी नुकसान झाले. तूरीच्या पिकाची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सोयाबीन यावर्षी हेक्टरी १ ते २ क्विंटल झाले. तूरीच्या उत्पन्नातही प्रचंड घट होणार आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी काही शेतकर्‍यांनी सोयाबीन काढणीचा खर्च सुद्धा निघणे शक्य नसल्यामुळे सोयाबीन काढलेच नाही असे सांगीतले. या प्रसंगी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा कृषि अधीक्षक चव्हाण, कारंजा उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, पं.स. सभापती भाष्कर शेगीकर, तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार साळवे, तालुका कृषि अधिकारी एम.जे.अरगडे, पं.स.सदस्य शेरूभाई फकिरावाले, संजय कातडे आदी उपस्थित होते.