शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब मिडटाऊनचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

रिसाेड : लायन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊनचा पदग्रहण समारंभ ५ सप्टेंबर राेजी येथील तोतला हाॅलमध्ये संपन्न झाला. ...

रिसाेड : लायन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाऊनचा पदग्रहण समारंभ ५ सप्टेंबर राेजी येथील तोतला हाॅलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ. मधुकर देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून पदग्रहण अधिकारी रिजन चेअरपर्सन वाशिमचे नितीन करवा, मनीष तोष्णीवाल, नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश साखरे, ज्येष्ठ सदस्य कमलकाका बगडे, डॉ. दिलीप धोपे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस लायन्स क्लबचे संस्थापक मेलविन जोन्स यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. लायन्स क्लबचे कॅबिनेट ऑफिसर स्व. विश्वनाथ तायडे, तसेच अनंत हराळकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. विजय प्रसाद तिवारी यांनी ध्वजवंदना सादर केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रिजन चेअरपर्सन लायन नितीन करवा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश साखरे व त्यांच्या नवीन कार्यकारिणीला शपथ दिली. ५ सप्टेंबरला शिक्षक दिन असल्यामुळे शहरातील ज्येष्ठ शिक्षकांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भारत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश नंदकुले, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद आरीफ, राजस्थान माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विवेकानंद ठाकरे, उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ सदस्य प्राचार्य विजयकुमार तुरुकमाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, तसेच लायन्स क्लबमध्ये वीस वर्षे ज्यांची सेवा झाली त्यांना इंटरनॅशनल लायन्स क्लबकडून आलेल्या पिनचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ला. मनीष तोष्णीवाल, प्राचार्य राजेंद्र नंदकुले यांची समयोचित भाषणे झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष ला. मंगेश साखरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनाेगत व्यक्त करून सर्व लायन सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचलन संतोष वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. तिवारी यांनी मानले. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे सर्व सदस्य, पदाधिकारी व आमंत्रित उपस्थित होते.

080921\img-20210908-wa0205.jpg

लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मिडटाउनचा पदग्रहण समारंभ