शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘आरसेटी’ प्रशिक्षण पूर्ण करणा-यांना तातडीने अर्थसहाय्य द्या!

By admin | Updated: August 29, 2016 00:09 IST

लोकप्रतिनिधींचे बँकांना आवाहन : महिला बचतगटांची कर्जप्रकरणे तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश.

वाशिम, दि. २८: ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित युवकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँकांनी तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक ए. एम. अहमद, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे उपस्थित होते. ह्यआरसेटीह्णचे संचालक प्रदीप पाटील यांनी अहवाल सादर केला. यावेळी खासदार गवळी म्हणाल्या, की ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना वेळेवर अर्थसहाय्य मिळत नसल्याने त्यांना स्वत:चा व्यवसाय उभारता येत नाही. या युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी मदत करणे आवश्यक आहे. ह्यआरसेटीह्णमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने कर्जासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यावर तातडीने निर्णय घेऊन अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.आमदार पाटणी म्हणाले, की व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज मागणी करणार्‍या युवकांना बँकांनी तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी होऊन युवक स्वावलंबी बनण्यास मदत होईल. तसेच व्यवसाय उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर होत असल्याची खात्रीही बँकांनी करावी. कर्जाचा इतर कारणांसाठी वापर झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले.बचतगटांचे कर्ज प्रस्ताव तातडीने निकाली काढा!महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांची स्थापना करण्यात आली; मात्र या बचतगटांना बँकांनी अपेक्षित सहकार्य न केल्यास महिलांचा विकास होणार नाही. त्यामुळे सर्वच बँकांनी महिला बचतगटांनी कर्जासाठी सादर केलेल्या प्रकरणांवर १५ दिवसांच्या आत निर्णय घेऊन त्यांना कर्ज वितरण करावे. त्यामुळे महिला बचतगट व ग्रामीण विकासाला हातभार लागेल, असे मत खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले.