शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो लाभार्थीच्या नशीबी प्रतिक्षाच

By admin | Updated: September 12, 2014 22:58 IST

मालेगाव तहसीलमधील संजय गांधी निराधार योजनेच्यो लाभार्थ्यांचे अर्ज धूळखात.

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेची दोन महिण्यापासून बैठकच झाली नसल्याने जवळपास चारशे ते पाचशे लाभार्थ्यांचे अर्ज तहसीलमध्ये धूळखात पडले आहेत. आता विधानसभा निवडणूकिच्या निमीत्ताने आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहिता शिथील होईस्तोवर लाभार्थ्यांंना त्यांच्या प्रस्तावास मंजूरी मिळण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात अधिक माहितीनुसार मालेगाव तहसील कार्यालयांतर्गत गठीत संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक जूलै महिण्यात झाली होती. जूलैच्या मध्यान्हात झालेल्या या समितीच्या बैठकीत शेकडो अर्जांना मंजूरात देण्यात आली असली तरी त्यानंतर दोन महिण्यात संजय गांधी निराधार योजना समितीची एकही बैठक न झाल्याने तेव्हापासून आजतागायत तहसीलमधील संजय गांधी निराधार योजना कक्षाकडे जमा झालेल्या ४00 ते ५00 अर्जावर निर्णय होउ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेंतर्गत श्रावण बाळ, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, परित्यक्तया , विधवा , अपंग यांना अनुदान देण्याची सोय आहे. यामध्ये किमान सहाशे रुपये ते एक किंवा दोन अपत्य असलेल्या विधवांना मासिक नउशे रुपये मानधन देण्याची सोय आहे. आता विधानसभा निवडणूकिच्या अनुषंगाने १२ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली. त्यामूळे मालेगाव तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीला आता लाभार्थ्यांंचे अर्ज निकाली काढण्यासाठी सभा घेवून निर्णय घेता येणार नाही. अर्थात लाभार्थ्यांना पात्र असूनही योजनेचा लाभ मिळण्यासाठी निवडणूका पार पडण्यासह आदर्श आचारसंहिता शिथील होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.