शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्तींच्या सुरक्षिततेबाबत मंडळे गाफील!

By admin | Updated: September 12, 2016 03:00 IST

वाशिम जिल्हय़ातील चित्र; अनेक ठिकाणी मंडपात कोणीच नाही, पोलिसांचेही दुर्लक्ष.

वाशिम, दि. ११ : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेला गणेशोत्सव जिल्ह्यात धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत बहुतांश गणेश मंडळं गाफील असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. १0 सप्टेंबरच्या रात्री १२ ते २ वाजेदरम्यान लोकमत चमूने, जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर , कारंजा व मानोरा या तालुक्याच्या ठिकाणी गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला.वाशिम जिल्हय़ात ६४६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी असली, तरी यापेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांनी ङ्म्रींची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला असला, तरी तो शहरातील मुख्य चौकांपुरताच र्मयादित दिसून येत आहे. रात्री ११ वाजतानंतर पोलिसांच्या गस्तशिवाय कुठेही विशेष व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आले. जिल्हय़ातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलीस गस्त व पोलीस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हय़ातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रमुख चौकातील मंडपांच्या पाहणीसह गल्लीबोळीतील मंडळाच्या पाहणीत बहुतांश मंडपांच्या आसपासही कुणीच नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले, तर काही ठिकाणी मात्र मंडळातील सदस्याची उपस्थिती दिसून आली. अनेक मंडपाच्या आतमध्येही कुणीच नसल्याचे जाणवले. गणरायांच्या काही मूर्ती रामभरोसे असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. सुरक्षा व्यवस्था गाफील असल्यामुळे या मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धार्मिक वाद निर्माण होण्याची घटनाही घडू शकते. या पृष्ठभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे असताना बहुतांश गणोशोत्सव मंडळं गाफील असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून दिसून आला.*वाशिम शहरामध्ये रात्री ११ ते १२.३0 वाजेदरम्यान ह्यलोकमतह्णच्या चमूने पाहणी केली असता अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी आढळून आले, तर गल्लीबोळीतील मंडपातील ङ्म्रींच्या मूर्ती मात्र असुरक्षित आढळून आल्यात.*मालेगाव येथे रात्री १२.३0 ते १ वाजेदरम्यान गणेश मंडळाचे गेट ओढलेले आढळून आले*रिसोड येथे मंडपाला साधा कपडा लावून आतमध्ये कोणीही आढळून आले नाही*कारंजा येथे बहुतांश ठिकाणी मंडपामध्ये युवक झोपलेले आढळून आले.*मानोरा येथे सुद्धा गणेश मंडळाने स्थापन करण्यात आलेल्या मंडपामध्ये कोणीच दिसून आले नाही. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी ङ्म्रींची मूर्ती स्थापन करुन मूर्ती संरक्षणाबाबत कोणतीच खबरदारी घेतलेली दिसून आली नाही. *मंगरुळपीर येथे तर काही ठिकाणी मंडपस्थळी आसपास कोणीच नव्हते. तर एका ठिकाणी तर चक्क रात्री १२.३0 वाजताच्या दरम्यान गणपतीला पडद्याने झाकूनसुद्धा ठेवण्यात आलेले नव्हते, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आढळून आली.