शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराजांच्या पालखीने नगरी दुमदुमली!

By admin | Updated: June 6, 2017 19:44 IST

मेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती. शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराज पालखीचे ६ जून रोजी मेडशी येथे सकाळी १०.३० वाजता आगमन झाले. पालखी येणार असल्याने पंचक्रोशितील शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. दरवर्षी प्रमाणे येथील शिवभवन येथ पालखीचे आगमन झाले व ११.३० वाजता वनपरिक्षेत्र कार्यालयात श्रींच्या पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रीं च्या पालखी सोबत ६५० वारकरी मंडळीसह ३ अश्व, ९ वाहने असून वारकऱ्यांकरीता रुग्णवाहिका, डॉक्टरमंडळी आहेत. पालखीच्या स्वागत पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, पिंटु बहादुरे, बबन आप्पा तोंडकर, कैलास तोंडकर, मधुकर बहादुरे, भागवत शिंदे, अजय वरुळकर, शिव गणेश मंडळाने जल्लोषात केले.  तसेच परंपरेनुसार पाठक परिवाराने पूजा अर्चा करुन पालखीचे स्वागत केले. माजी सरपंच डॉ. सुभाष मंत्री, संतोष मंत्री व परिवाराने स्वागत केले. यावेळी प्रियाताई पाठक, प्रदिप पाठक, शैलेश पाठक, प्रसाद पाठक, माणिक मुंढे, दिलीप जैन आदिनंी पालखीचे स्वागत केल्यानंतर पालखी गांधी चौकात पोहचली. येथे माजी सरपंच संजयराव घ्ज्ञुगे, बबन विटकरे,उत्तम विटकरे, पांडुरंग विटकरे, वासुदेवराव घुगे, डॉ. बाळासाहेब घुगे, डॉ. बाबासाहेब घुगे, प्रेमचंद जैन , वामन साठे, संतोष साठे आदिंनी स्वागत केले. तसेच पालखी पुढे गेल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुकूंदराव मेडशीकर, माजी पंचायत समिती सदस्य रणजीत मेडशीकर , अभिजित मेडशाीकर, बाळु पिंपळकर, गजानन महाराज पिंपळकर, बाळु थोरात, किशोर सावरकर, सुनिल घुगे तर वनपरिक्षेत्र  कार्यालयात वनपाल एस.एस. तायडे, यु. आर .राऊत आदिंनीस्वागत केले. श्रींच्या पालखीच्या दर्शनाकरिता कोळदरा, गोंधळवाडी, वाकळवाडी, उमरवाडी, काळा कामठा, पिंपळदरा, अंधारसावंगी, भौरद, भिलदुर्ग, गोकसावंगी मुंगळा सह पंचक्रोशितील  भाविक भक्तांनी लाभ घेतला.  यावेळी कळंम महाराजांचे प्रवचन झाले.  जिल्हा परिषद शाळेत पालखीने विसावा घेतला व मध्यान्हाचे भोजन करुन पालखी पुढे ब्राम्हणवाडा मार्गे श्री क्षेत्र डव्हाकरीता रवाना झाली.