शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अहवालात चार तालुके निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

................ अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष वाशिम : येथून कनेरगावकडे जाणाऱ्या मार्गावर गत काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू ...

................

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

वाशिम : येथून कनेरगावकडे जाणाऱ्या मार्गावर गत काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मनीष शिंदे यांनी जिल्हा वाहतूक शाखेकडे शुक्रवारी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली.

..............

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रलंबित

वाशिम : स्थानिक डम्पिंग ग्राऊंडवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे; मात्र अद्याप त्या ठिकाणी हे काम सुरू झालेले नाही. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी शब्बीर परसुवाले यांनी शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.

................

आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, १ सप्टेंबर रोजी रोजी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध आजारांमधील शंभरापेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

................

जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत सध्या मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील गावांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू आहे. यामाध्यमातून प्रामुख्याने जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती केली जात आहे. यासह मृदा संवर्धनासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे.

....................

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक

वाशिम : ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास गुरुवारी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवम बेंद्रे, योगेश लोनसुने, स्वप्निल विटोकार, डॉ. मोहन गोरे, ऋषिकेश अंभोरे आदिंची उपस्थिती होती.

.................

वाशिम पोलिसांकडून रात्रगस्त वाढविली

वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाशिम पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. नागरिकांना रात्रीच्या सुमारास कुठेही संशयास्पद प्रकार सुरू असल्याचे आढळून आल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...............

पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

वाशिम : येथील श्री शिवाजी विद्यालयापासून आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून पादचारी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.