पद्मतीर्थ तलावात आढळला मृतदेह

By Admin | Updated: September 22, 2015 01:56 IST2015-09-22T01:56:04+5:302015-09-22T01:56:04+5:30

आकस्मिक मृत्यूची नोंद.

Found dead at Padmetha lake | पद्मतीर्थ तलावात आढळला मृतदेह

पद्मतीर्थ तलावात आढळला मृतदेह

वाशिम : येथील रहिवासी रतनलाल बालचंद बज यांचा येथील पद्मतीर्थ तलावात मृतदेह आढळून आला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. रतनलाल बज यांचा मुलगा सागर याने शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मागील दोन वर्षांपासून रतनलाल बज मानसिक तणावाखाली होते व ते १८ सप्टेंबरपासून घरून निघाले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता, अपयशच हाती लागले होते. २१ सप्टेंबर रोजी ते पद्मतीर्थ तलावात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूबद्दल आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Found dead at Padmetha lake