माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी!

By संतोष वानखडे | Updated: March 14, 2023 19:28 IST2023-03-14T19:28:13+5:302023-03-14T19:28:47+5:30

माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

 Former MP Anantrao Deshmukh has joined BJP   | माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी!

माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी!

वाशिम: माजी खासदार, माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख यांनी दोन्ही पुत्र व पदाधिकाऱ्यांसह १४ मार्च रोजी मुंबई येथील भाजप कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार ॲड. विजय जाधव यांच्यासह राज्यातील आमदार तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघ तसेच वाशिम शहरातून माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे समर्थक उपस्थित होते. अनेक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सहा ते सात सदस्य, पंचायत समितीचे १२ ते १३ सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह पुत्र ॲड. नकुल देशमुख, चैतन्य देशमुख यांच्यासह देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. 

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजपाचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पक्षप्रवेशासाठी माझ्याकडे मागणी केली होती. ती मागणी आता पक्षाने पूर्ण केली असून, अनंतरावांच्या रुपाने वाशिम जिल्ह्यात भाजपाला मोठे बळ मिळेल, पक्ष अधिक बळकट होइल, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title:  Former MP Anantrao Deshmukh has joined BJP